Categories Civic Issues

केळबाई कुर्टी रस्त्यावर खड्ड्यामुळे तीन दुचाकींचा अपघात

निकृष्ट कामामुळे रस्त्याची झालेली दयनीय अवस्था; ठेकेदाराला काळ्या यादीत टाकण्याची स्थानिकांची मागणी केळबाई-कुर्टी रस्त्यावर मोठ्या खड्ड्यामुळे तीन दुचाकींचा अपघात होऊन काही जण जखमी झाले. गणेश चतुर्थीपूर्वी ठेकेदाराने केवळ एकाच थराचे काम करून काम अर्धवट सोडल्याचा आरोप रहिवाशांनी केला आहे. तो थर आता पूर्णपणे निघून गेल्याने रस्ता धोकादायक अवस्थेत आहे. या निष्काळजीपणाबद्दल सार्वजनिक बांधकाम खात्याच्या मंत्र्यांनी संबंधित ठेकेदाराला काळ्या यादीत टाकावे, अशी मागणी स्थानिकांनी केली आहे.

About The Author

More From Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *