दरवाढ रद्द करावी आणि पायाभूत सुविधांमध्ये सुधारणा करावी – काँग्रेस काँग्रेस नेते ओलान्सिओ सिमोइस यांनी वीज मंत्री सुदिन ढवळीकर यांच्या ४% वार्षिक वीज दरवाढ योग्य असल्याच्या विधानावर टीका केली. ५ वर्षांत २०% दरवाढ ही गोव्याच्या ६.३४% महागाईच्या पार्श्वभूमीवर स्वीकारार्ह नाही अस सिमोइस म्हणाले . त्यांनी दरवाढ ताबडतोब रद्द करावी तसच वेर्णा सब-स्टेशनची त्वरित सुधारणा करण्याची आणि नूतनीकरणीय ऊर्जा क्षेत्रात गुंतवणूक करण्याची मागणी केली.
Categories
Political

