3 DAY HEARING OVER MPT EXPANSION PROJECT BEGINS AT TILAK MAIDAN VASCO

Posted On April 26, 2017 By In Local, People, Top Stories


एमपीटीतून कोळसा हाताळणीला जनतेचा तीव्र विरोध
दक्षिण गोवा जिल्हाधिकाऱ्यांनी सुरू केली जनसुनावणी

एमपीटी विस्तारीकरण, कोळसा आणि लाकडी भूसा प्रदूषणासंदर्भात जनतेची गाऱ्हाणी ऐकण्यासाठी प्रशासनाने बुधवारपासून तीन दिवस जनसुनावणी सुरू केलीये. वास्कोतील टिळक मैदानावर उभारलेल्या भव्य मंडपात ही सुनावणी होत असून वास्को बरोबरच राज्यातील इतर भागातून आलेले लोकप्रतिनिधी, पर्यावरणवादी, राजकीय पुढारी आदींनी यात भाग घेतला. बुधवारी झालेल्या जनसुनावणीवेळी मुरगाव बंदरातील साऊथ वेस्ट पोर्ट लिमिटेडच्या धक्का क्र. ५ अ आणि ६ अ टर्मिनलची क्षमता वाढविण्यासंबधी नागरिकांची मते जाणून घेण्यात येत होती; यावेळी नागरिकांनी कोळसा प्रदूषणावरून अतिशय आक्रमक मते मांडली. प्रदूषण नियंत्रण मंडळाने बनवलेला अहवाल इंग्रजी भाषेतून असल्यानं त्याला आक्षेप घेण्यात आला. त्याचबरोबर पोर्टवरून होणारी कोळसा हाताळणी त्वरित बंद करावी, अशी मागणी कर्यात आली. यावेळी दक्षिण गोवा जिल्हाधिकारी स्वप्नील नाईक यांनी जनतेच्या भावना नोंदवून घेतल्या.

297
SHARES

Tags : , ,

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close