बोरीत कंटेनर आणि सिलिंडरवाहू टेंपोचा अपघात
बोरी भागात एका अरुंद रस्त्यावर व्हीआरएल कंपनीचा कंटेनर आणि एलपीजी सिलिंडरवाहू टेंपोची समोरासमोर धडक झाली. यावेळी टेंपोचालकानं प्रसंगावधान राखून टेंपो रस्त्याच्या बाजूला घेतला. टेंपोत एलपीजी सिलिंडर भरलेले होते. त्यामुळं बॅटरीचे कनेक्शन तोडले. या अपघातात कंटेनरच्या दर्शनी भागाचं नुकसान झालं. पोलिसांनी येऊन घटनेचा पंचनाम केला.