CCP GIVES ORDER TO STOP CONSTRUCTION WORK DUE TO RISK FACTOR FOR ART AND CULTURE DEPT BUILDING

Posted On March 2, 2017 By In Local, People, Politics, Top Stories


कला खात्याच्या इमारतीला धोका
बाजूच्या बांधकामामुळे इमारतीला धोका
महापालिकेनं दिला काम थांबवण्याचा आदेश

पणजी-पाटो इथल्या कला आणि संस्कृती खात्याच्या इमारतीजवळच सुरू असलेल्या एका खासगी आस्थापनाच्या बांधकामामुळे इमारतीला धोका निर्माण झालाय. कला आणि संस्कृती खात्याच्या इमारतीजवळ उजव्या बाजूचे खांब आणि लगतची जमीन पूर्णपणे खचलीये. त्यामुळं सदर बांधकाम त्वरित थांबवण्यात यावं, अशी नोटीस महापालिकेनं व्यवस्थापनाला बजावलीये. ही माहिती महापालिकेचे आयुक्त दीपक देसाई यांनी दिली.

voice
गेल्या दीड महिन्यापासून गोव्याबाहेरील ‘गेरा’ नावाच्या कंपनीनं व्यावसायिक प्रकल्प उभारण्यासाठी सुमारे १५ ते २० फूट खोल खोदकाम सुरु केल्यानं इथल्या कला भवन तसेच सेंट्रल लायबरीच्या इमारतीला धोका निर्माण झालाय. तसंच इमारतीच्या भितींलाही भेगा पडल्या आहेत. अगोदरच पाटो प्लाझा येथील सारी जमीन चिखलमय असल्याने त्याचा परिणाम म्हणून तेथील इमारती खचत असल्याचे निदर्शनास आले आहे. यापूर्वी वस्तू संग्रहालयाची इमारत एवढी खचलीये आहे की सध्या ‘डेंजर’ इमारतीमध्ये तिचा समावेश करण्यात आलाय. त्यामुळं ही इमारत पाडून त्या जागी नवीन इमारत उभारली जाणाराहे; मात्र तूर्तास गेराच्या प्रकल्पामुळं ही इमारत एका बाजूनं खचल्याचं दिसून आलंय. त्यामुळं इमारतीला पोहोचणार्‍या धक्क्याची दखल घेत, कला आणि संस्कृती खात्याचे संचालक प्रसाद लोलयेकर यांनी बुधवारी महापालिका आणि नगर नियोजन खात्याकडे लेखी तक्रार सादर केली. या तक्रारीवर त्वरित कारवाई करीत महापालिकेचे आयुक्त दीपक देसाई यांनी बाजूला सुरु असलेले बांधकाम पुढील आदेश मिळेपर्यंत थांबवण्यात यावेत, असा आदेश दिलाय.

265
SHARES

Tags : , ,

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close