Chopper carrying Maharashtra CM Devendra Fadnavis crash-lands in Latur

Posted On May 25, 2017 By In Local, Politics, Top Stories


मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस गुरुवारी हेलिकॉप्टर अपघातातून थोडक्यात बचावले. लातूरहून मुंबईकडं येण्यासाठी टेक ऑफ घेतल्यानंतर काही क्षणातच त्यांचं हेलिकॉप्टर कोसळलं. सुदैवानं मुख्यमंत्र्यांसह हेलिकॉप्टरमधील अन्य चारजण सुखरूप आहेत.

भारतीय जनता पक्षाच्या शिवार यात्रेला गुरुवारी लातूर जिल्ह्यातील निलंग्यातून सुरुवात झाली. त्यासाठी मुख्यमंत्री लातूरला गेले होते. तिथं श्रमदान केल्यानंतर मुख्यमंत्री मुंबईकडं येण्यासाठी निघाले होते. मुंबईकडं येण्यासाठी त्यांच्या हेलिकॉप्टरनं टेकऑफ घेतला खरा, पण काही क्षणातच ते जमिनीवर कोसळलं. मात्र, दुर्घटनेच्या वेळी हेलिकॉप्टर जास्त उंचीवर नसल्यानं अनर्थ टळला. पंख्यात बिघाड झाल्यामुळे हा अपघात घडल्याचं कळतं.

240
SHARES

Tags : , ,

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close