CONGRESS PREPARES CHARGESHEET AGAINST BJP

Posted On October 17, 2016 By In Local, People, Politics, Top Storiesकाँग्रेसने सरकारवर ठेवले आरोपपत्र
घरोघरी जाऊन भाजपचा करणार पर्दापाश
प्रतापसिंग राणे यांच्या हस्ते आरोपपत्र जारी

भाजपनं रविवारी लोकसंपर्क अभियान सुरू केल्यावर सोमवारी कॉंग्रेसनं भाजपच्या विरोधात आरोपपत्र जारी केलं. आता कॉंग्रेसही घरोघरी जाऊन भाजपच्या यूटर्नची जनतेला माहिती देणाराहे. प्रदेशाध्यक्ष लुईझिन फालेरो आणि विरोधी पक्षनेते प्रतापसिंग राणे यांच्या हस्ते सोमवारी हे आरोपपत्र जारी करण्यात आलं.

साडेचार वर्षांच्या काळात भाजप सरकारनं विविध प्रश्नांवर घेतलेले यू टर्न तसंच आश्‍वासने पूर्ण करण्याच्या बाबती आलेले अपयश, याचा पर्दाफाश करणारं आरोपपत्र प्रदेश काँग्रेसतर्फे तयार करण्यात आलंय. सोमवारी इन्स्टिट्यूट मिनेझिस ब्रागांझा सभागृहात प्रदेशाध्यक्ष लुईझिन फालेरो आणि विरोधी पक्षनेते प्रतापसिंह राणे यांच्या हस्ते या आरोपपत्राचं प्रकाशन करण्यात आलं. यावेळी पक्षाचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते.

या आरोपपत्रात कॅसिनो, ड्रग्स, राज्याला खास दर्जाच्या बाबतीत झालेली फसवणूक, वाढती महागाई, बेरोजगारांना बेकारी भत्ता देण्यात आलेले अपयश आदी मुद्दे या आरोपपत्रात नमूद करण्यात आलेत. एकून १२ पानांचं हे आरोपपत्र कोकणी देवनागरी आणि रोमी, मराठी, इंग्रजी भाषेतून मिळून साडेतीन लाख प्रती छापलेल्या आहेत. या आरोपपत्रातून जनतेला भाजप सरकारचा खरा चेहरा समजेल, असा सूर यावेळी कॉंग्रेसच्या सर्वच नेत्यांनी आळवला.

214
SHARES

Tags : , , ,

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close