……And desecration continues In State

Posted On July 25, 2017 By In Crime, Local, People, Top Stories


दक्षिणेत धार्मिक प्रतिकांची तोडफोड सुरूच
करंजाळ – मडकईतील सिमेंत्रीमधील क्रॉसची तोडफोड
संशयिताला पकडल्यानंतरही सत्र सुरूच
पोलिसांच्या तपासावर उभे राहिले प्रश्नचिन्ह
आता हे नवे समाजकंटक कोण?
पोलिसांनी सुरू केले तपासकार्य

दक्षिण गोव्यात धार्मिक प्रतिकांची तोडफोड केल्याप्रकरणी फ्रान्सिस परेरा याला अटक केल्यानंतर असे प्रकार थांबतील असा समज सामान्य गोवेकरांना झाला होता; मात्र परेरा कोठडीत असतानाही असे प्रकार चालूच असल्याचं पुन्हा एकदा समोर आल्यानं पोलिसांच्या तपासावर मोठं प्रश्नचिन्ह उपस्थित झालंय. हा प्रकार करंजाळ – मडकई इथं मंगळवारी दुपारी उघडकीस आला. इथल्या एका सिमेंत्रीमधील १० ते १२ क्रॉसची तोडफोड झाल्याचं दिसून आल्यानं पोलिसाही चक्रावून गेलेत. त्यामुळं यापूर्वी पोलिसांनी पकडलेला संशयित खरंच अशा प्रकरणात गुंतला आहे का? या प्रकरणांच्या मागे काही पद्धतशीर कट आहे का? आणि यामध्ये समाजकंटकांची मोठी टोळी गुंतली आहे का? अशा अनेक प्रश्नांची उत्तरे शोधण्याचं आव्हान पोलिसांसमोर उभं राहिलंय.
——————————————–

218
SHARES

Tags : , , , ,

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close