Freedom fighter Madhav Korde shoots himself and dies

Posted On July 16, 2016 By In Local, National News, Top Stories


कुर्टी-फोंडा इथे स्वातंत्र्यसैनिकाची आत्महत्या
स्वा.सै. माधव कोरडे यांनी स्वत:वरच झाडली गोळी
वृद्धापकाळातील आजारपणाला कंटाळून आत्महत्या केल्याचा संशय
कोरडे यांनी गोवा मुक्तीसाठी भोगला होता तुरुंगवास

कुर्टी-फोंडा इथंले रहिवाशी स्वातंत्र्यसैनिक माधव कोरडे यांनी शनिवारी राहत्या घरीचं स्वत:वर बंदुकीतून गोळी झाडून आपली जीवनयात्रा संपवली. या प्रकारानं परिसरात खळबळ माजली. मृत्यूसमयी त्यांचं वय ८४ वर्षे इतकं होतं. याप्रकरणाची माहिती मिळताच फोंडा पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला आणि मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी गोमेकॉत पाठवून दिला.

दरम्यान, वृद्धापकाळाने दुर्धर आजाराला कंटाळून त्यांनी आत्महत्या केली असावी, असा कयास वर्तवण्यात येताहे. सतत उद्भवणाऱ्या आजारांमुळं कुटुंबातील सदस्यांना त्रास होत असल्याचं ते काही दिवसांपासून बोलून दाखवत होते. यातूनचं अखेर शनिवारी दुपारी कुर्टी फोंडा इथं राहत्या घरात त्यांनी पोटावरून छातीच्या दिशेने गोळी झाडून आत्महत्या केली. या बातमीमुळं परिसरात खळबळ माजली. या घटनेची माहिती मिळताच दक्षिण गोव्याचे खासदार नरेंद्र सावईकर, स्थानिक पंचायतीचे सदस्य आदींनी धाव घेतली.

दरम्यान, स्वातंत्र्यसैनिक माधव कोरडे यांचा जन्म २९ ऑक्टोबर १९३१ रोजी झाला होता. गोवा मुक्तीसंग्रामात त्यांनी मोठं योगदान दिलं होतं. स्वातंत्र्यलढ्यात भाग घेतल्यानं पोर्तुगीजांनी त्यांना तुरुंगातही डांबलं होतं. त्यांच्या या योगदानाची दखल घेऊन गेल्याचं महिन्यात ‘१८ जून’ रोजी क्रांतीदिनाला त्यांचा जाहीर सत्कार करण्यात आला होता. त्यांनी अशाप्रकारे आपली जीवनयात्रा संपवल्यानं फोंडा तालुक्यातून हळहळ व्यक्त करण्यात येताहे.

246
SHARES

Tags : , , ,

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close