GMR wins Mopa Airport contract

Posted On August 26, 2016 By In Local, People, Politics, Top Stories


GMR wins Mopa Airport contract

मोपा विमानतळाचे कंत्राट मुंबईच्या ‘जीएमआर कंपनी’ कंपनीला
संबंधित कंपनीला कंत्राट स्वीकारण्यासाठी १५ दिवसांची मुदत
पर्वरी सचिवालयात मोपा विमानतळाच्या कंत्राटदाराची घोषणा

सुमारे ३ हजार ३०० कोटी रुपये खर्चाच्या मोपा आंतरराष्ट्रीय विमानतळाचं कंत्राट अखेर मुंबईच्या जीएमआर कंपनीला मिळालं. पर्वरी सचिवालयात शुक्रवारी झालेल्या कार्यक्रमात या निविदा उघडण्यात आला. एकून पाच कंपन्यांनी ऑनलाईन पद्धतीनं कंत्राटासाठी अर्ज केले होते. त्यातून सरकारला जास्तीत जास्त लाभ मिळवून देणाऱ्या जी. एम. राव यांच्या जीएमआर कंपनीला कंत्राट देण्यात आलं.
मोपा आंतरराष्ट्रीय विमानतळ प्रकल्पासाठीची महत्त्वाची वित्तीय निविदा उघडण्यात आली असून या विमानतळ उभाणीसाठी जी. एम. राव यांच्या जीएमआर कंपनीची निवड करण्यात आली. शुक्रवारी पर्वरी सचिवालयात झालेल्या जाहीर कार्यक्रमात ही निवड करण्यात आली. आता सरकारनं जरी कंत्रादार कंपनीची निवड केली असली तरी, कंपनीनंही सरकारचा प्रस्ताव स्वीकारायला हवा. यासाठी कंपनीला पुढील १५ दिवसांचा अवधी देण्यात आलाय.

या ग्रीनफिल्ड विमानतळ प्रकल्पासाठी भारतीय विमान पत्तन न्याससहित पाच कंपन्यांनी रस दाखवला होता. त्यात वॉलअप, जीव्हीके, जीएमआर, एस्सेल इंडिया यांचा समावेश होता. गेल्या २६ जुलै रोजी या प्रकल्पासाठी वित्तिय निविदा खोलल्या जाणार होत्या, मात्र काही कंपन्यांनी आणखी मुदतवाढ मिळावी, यासाठी सरकारला निवेदन सादर केलं. या पाचही कंपन्यांनी सारी प्रक्रिया ऑनलाईन केली होती. यातून राज्य सरकारला जास्तीतजास्त लाभ मिळवून देईल, अशाच जीव्हीके कंपनीची गोवा सरकार निवड केली.

आता जीव्हीकेला कंत्राट स्वीकारण्यासाठी १५ दिवसांची मुदत देण्यात आलीये. त्यानंतर प्रत्यक्षात तीन ते चार महिन्यात बांधकामाला सुरूवात होईल. प्रकल्पाची पायाभरणी मात्र सप्टेंबरच्या तिसऱ्या आठवडय़ात किंवा सप्टेंबरच्या अखेरीस करण्याचा इरादा आहे.

या विमानतळ प्रकल्पासाठी राज्य सरकारने 2 हजार 300 एकर म्हणजेच जवळपास 88 लाख चौरसमीटर जमीन संपादन करून ठेवलीये. विमानतळ प्रकल्प तीन टप्प्यात पूर्ण करण्याचे उद्दिष्ठ आहे. पहिल्या टप्प्यात सुमारे 3 हजार कोटी खर्च अपेक्षित असून डिसेंबर 2019 मध्ये या विमानतळावरील धावपट्टीवरून पाहिले विमान धावेल, असा सरकारला विश्वास वाटतो.

200
SHARES

Tags : , ,

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close