माशांप्रमाणे ‘पाव’ हाही गोमंतकियांच्या जिव्हाळ्याचा विषय… पण त्याच्या दरवाढीवरून गेली दोन महिने गोंधळ निर्माण झाला होता. हा गोंधळ मिटला असून आता १ ऑगस्टपासून ४ रुपये या दराने पावांची विक्री होणाराहे.
voice over
गेल्या काही वर्षांपासून गोमंतकियांच्या जिव्हाळ्याचा ‘पाव’ ३ रुपये दरानं मिळायचा. महागाई वाढल्यानं या पावचे दर वाढवण्याचा निर्णय ऑल गोवा बेकर्स असोसिएशन आणि ऑल गोवा बेकर्स अँड कन्फेक्शनर्स असोसिएशन या दोन संघटनांनी घेतला होता; मात्र पावाचे दर किती ठेवायचे, यावरून दोन्ही संघटनांत मतभेत झाल्यानं गोंधळ निर्माण झाला होता. एका संघटनेनं ३० ग्रॅमच्या पावाला ३ रुपये आणि ५० ग्रॅमच्या पावासाठी ५ रुपये आकारण्यात येणार असल्याचं घोषित केलं होतं. परिणामस्वरूप प्रत्यक्षात १ जुलै रोजी जेव्हा वाढ अमलात आली तेव्हा मनमानी पद्धतीनं एकच पर्याय उपलब्ध करण्यात आला.
गोव्याच्या अनेक भागात ५ रुपयांचा पाव लोकांच्या माथी मारण्यात आला, तर त्याचवेळी काही भागांमध्ये आधीच्या ३ रुपये दारानं विक्री चालू होती. खरे तर हा गोंधळ निस्तरण्यासाठी सरकारनं हस्तक्षेप करायला हवा होता, पण तसं झालं नाही. आता बेकरीवाल्यांची शनिवारी एक बैठक झाली. त्यात पावाचे वजन कमी करून दर ४ रुपये ठेवाण्याचा निर्णय घेण्यात आला.