GOA DAIRY CHAIRMAN VOTED OUT OF CHAIR BY 9:1 VOTES

Posted On July 6, 2016 By In Local, People, Top Stories


बाबुराव फडते देसाई यांची अखेर गच्छन्ति
गोवा डेअरीच्या अध्यक्षांवरील अविश्वास संमत
९ विरुद्ध १ मतांनी ठराव झाला संमत

गोवा डेअरीचे अध्यक्ष बाबुराव फडते देसाई यांच्याविरुद्ध दाखल केलेला अविश्वास ठराव अखेर बुधवारी ९ विरुद्ध १ मतांनी संमत झाला. उच्च न्यायालयानं दिलेल्या निर्देशानुसार साहाय्यक सहकार निबंधक यांनी हे मतदान घेतलं.
दूध उत्पादनात मागे असलेल्या पण राजकारणात सर्वांत पुढे असलेल्या गोवा डेअरीमध्ये अध्यक्ष पदासाठी नेहमीच संगीतखुर्चीचा खेळ चालू असतो. यावेळेस या खेळातून बाबुराव फडते देसाई यांना अध्यक्षपदाची खुर्ची गमवावी लागलीये.

बाबुराव फडते देसाई यांच्याविरुद्ध २९ एप्रिल २०१६ रोजी अविश्वास ठराव दाखल करण्यात आला होता. गोवा डेअरीतील अंदाधुंद कारभार आणि शेतकऱ्यांचे हित जपण्यात आलेले अपयश ही या ठरावामागची मुख्य कारणे होती. डेअरीच्या ११ संचालकांपैकी ९ जणांनी या ठरावावर सह्या केल्या होत्या.

या ठरावावर १८ मे २०१६ या दिवशी चर्चा ठेवण्यात आली होती. मात्र त्यावेळी तो ठराव बारगळला होता. सर्वोच्च न्यायालयाने गुजरात को-ऑपरेटिव्ह मिल्क मार्केटिंग फेडरेशनच्या एका खटल्यावर अविश्वास ठरावाबाबत सुनावणी देताना काही मार्गदर्शक तत्वे घालून दिली होती. त्यानुसार सहकारी संस्थेच्या अध्यक्षाविरुद्ध पदभार सांभाळल्यापासून दोन वर्षांच्या कार्यकाळात आणलेला अविश्वास ठराव ग्राहय़ धरता येणार नाही. हा तांत्रिक मुद्दा अध्यक्ष बाबुराव देसाई यांनी उपस्थित केल्यानंतर त्यावर चर्चा होऊन ठराव बारगळला होता. मात्र त्यांच्यावर पुन्हा ठराव दाखल झाल्यानंतर बुधवारी साहाय्यक सहकार निबंधकांच्या देखरेखीखाली त्यावर मतदान घेण्यात आलं. यावेळी ९ विरुद्ध १ अशा मतांनी फडते देसाई यांना पद गमवावं लागलं.

220
SHARES

Tags : ,

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close