In Goa Effect: Art & Culture Minister visits 100 Year Old woman living alone in Khandola

Posted On July 12, 2017 By In Local, People, Top Stories


अखेर निराधार वृद्धेला देणार मंत्री गावडे ‘आधार’
‘इन गोवा’च्या वृत्ताची मंत्री गावडे यांनी घेतली दखल
खांडोळ्यातील देवकी नाईकची भेट घेऊन केली विचारपूस
रेशन, धान्य, औषधे, सरकारी योजना मिळणार घरपोच
मंत्री गोविंद गावडे यांनी वृद्धेला दिले आश्वासन

खांडोळा येथे एकाकी आणि हालाकीचे जीवन जगणाऱ्या १०० वर्षांच्या निराधार वृद्ध महिलेला अखेर सर्व प्रकारचा आधार देण्याचं आश्वासनं कलामंत्री गोविंद गावडे यांनी दिलं. अंथरुणाला खिळून असलेल्या या वृद्धेची करुणाजनक कहाणी मंगळवारी ‘इन गोवा’नं प्रकाशात आणताच मंत्री गावडे यांनी या वृत्ताची तत्परतेने दखल घेतली. लगेच बुधवारी त्यांनी वृद्धेच्या घरी जाऊन तिची विचारपूस केली. देवकी वासुदेव नाईक असं या निराधार वृद्धेचं नाव आहे. दयानंद सामाजिक सुरक्षा योजनेचा लाभ घेण्यासाठी आधारकार्ड घेऊन येण्याची सूचना बँकेनं केल्यानं ही वृद्ध हवालदिल झाली होती. आता तिला सरकारी योजना, धान्य, औषधे घरपोच देण्याचं आश्वासन मंत्री गावडे यांनी दिलंय.

287
SHARES

Tags : , , ,

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close