GOA TO HAVE VVPAT MACHINES IN COMING ELECTIONS

Posted On October 17, 2016 By In Local, People, Politics, Top Storiesयंदा पहिल्यांदाचं मतदानानंतर मतदारांना तपासायला मिळणार पावती
निवडणुकीत होणार व्हीव्हीपीएटी बसवलेल्या ईव्हीएम मशीनचा वापर

मतदानानंतर निकालामुळे होणे राजकीय वादविवाद टाळण्यासाठी सर्वोच्च न्यायालयानं निवडणूक आयोगाला व्हीव्हीपीएटी बसवलेले ईव्हीएम मशीन वापरण्याचा आदेश २०१३ साली दिला होता. त्यानुसार गोव्यातही अशा यंत्राचा वापर व्हावा, यासाठी राजकीय पक्षांनी तगादा लावला होता. आता निवडणूक आयोगानंही ही यंत्रणा वापरण्याचा विचार चालवलाय. अखेर ही यंत्रणा आहे तरी काय? प्रश्न मतदारांना पडला असेल. मतदारांच्या शंकेचं निरसन करण्यासाठी पहा इन गोवाचा हा खास रिपोर्ट…

हिंदुस्थानाला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर लोकांना पसंतीचा राजा निवडता यावा, यासाठी लोकशाही शासनयंत्रणा हिंदुस्थाननं स्वीकारली. ही विचारधार देशातील तमाम नागरिकांनाही पसंत पडली. त्यानुसार दर पाच वर्षांनी निवडणुका सुरू झाल्या. सुरुवातीला एका कागदावर विविध राजकीय पक्ष आणि त्यांची चिन्हे छापलेली असायची. त्यानुसार मतदारांना पक्षाच्या चिन्हावर शिक्का मारून तो कागद एका बंद पेटीमध्ये टाकला जायचा, पण पुढे गुंड प्रवृत्तीचे राजकारणी पतपेट्या पळवू लागले. या प्रकारावर आवाज उठवल्यावर इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्रे अमलात येऊ लागली, पण त्यातही पूर्वीचं सेटिंग करता येऊ शकते, ही बाब उघडकीस आली. सत्तापिपासू राजकारणी या यंत्रात सेटिंग करून घ्यायचे. त्यामुळं निकालावर परिणाम व्हायचा. याचं कारणं मतदारानं कुठच्याही चिन्हावर बटण दाबलं तरी एका विशिष्ट पक्षाच्या चिन्हावर ते अंकित व्हायचं. ही चालूगिरी लक्षात आल्यानं मतदारांना आपण कोणाला मतदान केलं, हे समजावं, अशी मागणी होऊ लागली.

त्यानुसार सर्वोच्च न्यायालयानं निवडणूक आयोगाला व्हीव्हीपीएटी बसवलेले ईव्हीएम मशीन वापरण्याचा आदेश २०१३ साली दिला. यंदा गोव्यातही या मशीनचा वापर होणाराहे. अखेर काय आहे, हा प्रकार ते पहा…

वोटर-वेरिफाईड पेपर ऑडिट ट्रेल अर्थात व्‍हीव्‍हीपीएटी या पध्‍दतीद्वारे मतदारांना मतदान यादी, मत पध्‍दतीचा उपयोग करून त्‍वरित फिडबॅक मिळविण्‍याची तरतूद आहे. व्‍हीव्‍हीपीएटी ही इलेक्‍ट्रॉनिक वोटिंग मशीनसाठी एक स्‍वतंत्र तपासणीपध्‍दती असून मतदाराला त्‍यांचे मत पुन्‍हा तपासण्‍यासाठी अवधी प्राप्‍त करून देते.

व्‍हीव्‍हीपीएटी अंतर्गत इलेक्‍ट्रॉनिक वोटिंग मशीनला प्रिंटर जोडलेला असतो. जेव्‍हा मत दिले जाते तेव्‍हा उमेदवाराचे नांव, निवडणूक चिन्‍ह, अनुक्रमणिका नंबर दाखविण्‍यात येतो. यामुळे मतदाराने मतदान केले हे पक्‍के होते. सर्वप्रथम मतदान करतांना मतदाराला, मतदान हे एक आव्‍हान असते. नवीन नियमांनुसार निवडणूक केंद्र निर्णय अधिकारी मतदाराचा अहवाल ठेवत असतो. जो मत मोजण्‍याच्‍या वेळेला कामी येतो. व्‍हीव्‍हीपीएटी पध्‍दत ही मतदानाचा दर्जा ठरवण्‍याची उत्‍तम पध्‍दत आहे. या यंत्रणेमुळे निवडणुकीतील गैरप्रकारांना आळा घालता येईल. निवडणुकांच्या इलेक्ट्रॉनिक निकालांचे लेखापरीक्षण करण्यासाठी हे एक प्रभावी साधन ठरणार आहे.

216
SHARES

Tags : , ,

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close