GROUP OF TOURISTS ASSAULTS TAXI DRIVER AT MAPUSA

Posted On June 5, 2017 By In Crime, Local, People, Top Stories


पर्यटकांकडून टॅक्सीचालकास मारहाण
म्हापशातील प्रकार; संतप्त जमावाकडून बसला घेराव
पोलिसांनी धाव घेऊन परिस्थितीवर आणले नियंत्रण

म्हापशातील नव्या बसस्थानकावर उभी केलेली कार काढण्यासाठी गेलेल्या स्थानिक टॅक्सीचालकाला कारमधून आलेल्या मुंबईतील पर्यटकांनी मारहाण केल्यामुळं रविवारी संध्याकाळी प्रकरण बरच चिघळलं. त्या टॅक्सीचालकाला मारहाण होत असल्याचं पाहून आजूबाजूचे लोक जमा झाले आणि त्यांनी पर्यटकांना यथेच्छ चोप दिला. यामुळे गांगरून गेलेल्या पर्यटकांनी स्वत:चा बचाव करण्यासाठी मिळेल त्या दिशेनं पळ काढला. काहीजणानी बाजूला उभ्या असलेल्या आरामदायी बसचा आसरा घेतला. घटनेची माहिती मिळताच पोलिसांचा ताफा त्या ठिकाणी दाखल झाला आणि त्यांनी जमावावर नियंत्रण मिळवलं. यावेळी जमावातील नागरिकांनी पर्यटकांच्या दादागिरीवर जोरदार टीका केली.

218
SHARES

Tags : , , ,

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close