GSM SAYS “MANNU AAMHALA TUJYAWAR BHAROSA NAAY”

Posted On July 25, 2017 By In Local, People, Politics, Top Stories


‘गोसुमं’चा सहाव्या कॅसिनोला विरोध
कॅप्टन ऑफ पोर्टसमोर केली निदर्शने
कांडा यांच्या कॅसिनोच परवाना रद्द करण्याची मागणी
‘मन्नू आम्हाला तुझ्यावर भरोसा नाय हाय?’
‘गोसुमं’च्या गीतानं राजधानी दणाणली

सरकारच्या चुकीच्या धोरणांच्या विरोधात पूर्वी मोर्चे काढून किंवा निदर्शने करून आंदोलनं केली जायची. आता हा ट्रेंड बदलत चाललाय. आता ही आंदोलने नुसती मोर्चा काढून निषेध करण्यापूरती संकुचित राहिलेली नाहीयेत. आणि विशेषत: जेव्हा कलाकार अशा आंदोलनांमध्ये सहभागी होतात, तेव्हा त्याची परिणामकारकता आणखीच वाढते. हल्लीच आरजे मलिष्कानं मुंबई महानगरपालिकेच्या विरोधात रचलेलं गाणं तुम्ही ऐकलचं असेल. सोनू तुला माझ्यावर भरोसा नाय का? या गाण्याच्या चालीवर रचलेलं ही गाणं फारच गाजलं. आता याच गीताच्या चालीवर प्रादेशिक भाषांमध्ये सरकारच्या धोरणांविरोधात नवनवीन गीते रचली जातातहे. गोव्यातही आता या गीतावर रचना सुरू झाल्याहेत. असंच एक गीत गोवा सुरक्षा मंचनं मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांच्यावर रचलंय. कॅप्टन ऑफ पोर्टसमोर निदर्शने करताना त्यांनी हे गीत गाऊन परिसर दणाणून सोडला.

228
SHARES

Tags : , , , , ,

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close