मान्सूनपूर्व कामांत केली जाते टंगळमंगळ
मळा-पणजी भागातील रस्त्यांना आलं तळ्याचं स्वरूप
मान्सूनपूर्व कामात टंगळमंगळ केली जात असल्यानं सामान्य जनतेचे हाल होताहेत. याचा प्रयत्न सध्या मळा-पणजीतील नागरिक घेताहेत. मंगळवारी सकाळपासून पडणाऱ्या संततधार पावसामुळं या भागाला तळ्याचं स्वरूप आलं होतं. या भागातील गटारे व्यवस्थित स्वच्छ न केल्यानं पाणी तुंबून रस्त्यावर आलं. या ठिकाणी एका रहिवाशाच्या घरात पाणी शिरल्यानं त्याची मोठी पंचाईत झाली. या प्रकारामुळं मान्सूनपूर्व कामांचं नाटक करून जनतेच्या पैशांची विल्हेवाट लावली जात असल्याची टीका नागरिकांतून होताहे.