INSPECTION TO BUILD RETAINING WALL AT MORJIM

Posted On July 17, 2016 By In Local, People, Top Stories


मच्छिमारांच्या होड्या वाहून गेल्यानंतर आली सद्बुद्धि
मोरजी किनारी संरक्षण भिंत बांधण्याची प्रक्रिया सुरू
प्रशासकीय अधिकाऱ्यांनी केली किनाऱ्याची पाहणी

गेल्या आठवड्यात मोरजीत समुद्राच्या लाटेमुळं मच्छीमारांच्या होड्या आणि जाळी वाहून जाण्याची घटना शनिवार, ९ जुलै या दिवशी घडली होती. या दुर्घटनेनंतर मोरजी किनाऱ्यावर संरक्षण भिंत उभारण्याची सद्बुद्धि प्रशासनाला झाली असून शुक्रवारी प्रशासकीय अधिकाऱ्यांनी या ठिकाणाची पाहणी केली.
मोरजी किनाऱ्याची धूप होऊन समुद्राचं पाणी आता सीमारेषा ओलांडू लागलंय. या सीमेवर संरक्षण भिंत बांधण्याची मागणी गेल्या कित्तेक वर्षांपासून मच्छीमार करत होते; मात्र सरकारनं त्यांच्या मागणीकडे ढुंकूनही पाहिलं नाही. परिणामी गेल्या आठवड्यात समुद्राच्या लाटा मच्छीमारांच्या शेडमध्ये येऊन आदळल्या आणि शेडसहित मच्छीमार जाळी, होड्या वाहून गेल्या. यामुळं गरीब मच्छीमारांचं प्रचंड नुकसानं झालं. ‘शापोरा रिव्हर फ्रंट’च्या केवळ संरक्षण भिंतीवर ९७ कोटी रुपये खर्च करण्याची तयारी करणारे सरकार मच्छीमारांकडे दुर्लक्ष करताहे, अशी टीका त्यावेळी मोरजी मच्छीमार संघटनेनं केली होती. इतका सगळा विध्वंस झाल्यानंतर आता प्रशासनाला जाग आलीये. या किनाऱ्यावर संरक्षण भिंत उभारण्याची सद्बुद्धि प्रशासनाला झालीये. शुक्रवारी प्रशासकीय अधिकाऱ्यांनी या भागाला भेट देऊन संरक्षण भिंतीसाठी जागेची पाहणी.

214
SHARES

Tags : , , ,

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close