मराठी राजभाषेसाठी रविवारी निर्धार मेळावा
निर्धार मेळाव्याला मोठ्या संख्येनं उपस्थित राहा
मराठी राजभाषा समितीचे मराठीप्रेमींना आवाहन
मराठी राजभाषा समितीने मराठी राजभाषा मागणीसाठी निर्धार मेळावा आयोजित केलाय. हा मेळावा रविवार, दि. १३ नोव्हेंबर रोजी पणजीतील आझाद मैदानावर संध्याकाळी ४ वाजता होणाराहे. मराठी राजभाषेच्या मागणीचा एल्गार करण्यासाठी या मेळाव्याला मराठीप्रेमींनी मोठ्या संख्येनं उपस्थित राहावं, असं आवाहन समितीनं केलंय.