MEETING OF AIRPORT AUTHORITY COMMITTEE HELD UNDER THE CHAIRMANSHIP OF MP SAWAIKAR

Posted On May 17, 2017 By In Local, Top Stories


दाबोळी विमानतळावरील विविध समस्यांवर बैठक संपन्न
नव्या टर्मिनसमधील कामकाज लवकरच होणार कार्यान्वित
विमानतळ परिसरातील कचऱ्याची समस्या निघणार निकालात
खासदार सावईकर, आमदार कार्लूस यांनी दिली माहिती

दाबोळी विमानतळावरील विविध समस्या सोडवण्यासाठी विमानतळ प्राधिकरणानं बुधवारी विशेष बैठकीचं आयोजन केलं होतं. या बैठकीत दक्षिण गोव्याचे खासदार नरेंद्र सावईकर आणि स्थानिक आमदार कार्लूस आल्मेदा आणि प्राधिकरणाचे अधिकारी उपस्थित होते. दाबोळी विमानतळावरील नव्या टर्मिनसमध्ये अजून काही सुविधा उभारणे बाकी आहे. या सुविधा लवकर उभारणे, विमानतळाच्या आजूबाजूचा परिसर स्वच्छ ठेवणे, आणि इमिग्रेशनची समस्या सोडवणे, आदि विषयांवर चर्चा झाल्याची माहिती खासदार सावईकर यांनी यावेळी दिली.

272
SHARES

Tags : ,

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close