NO CONFIDENCE MOTION AGAINST BAEDEZ BAZAAR CHAIRMAN

Posted On February 22, 2017 By In Local, People, Politics, Top Stories


बार्देश बाजारच्या अध्यक्षांवरील अविश्वास ठराव समंत
मुंबई उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार घेतले मतदान
११ विरुद्ध १ मतांनी अविश्वास ठराव केला संमत
जयवंत नाईक यांच्यावरील अविश्वास ठराव संमत
संचालक मंडळाच्या बैठकीत झाले मतदान

बार्देश बझारचे अध्यक्ष जयवंत नाईक यांच्याविरुद्ध ठेवलेला अविश्वास ठराव ११ विरुद्ध १ मतांनी संमत झाला. मुंबई उच्च न्यायालयाच्या गोवा खंडपीठानं सहकार निबंधकाला ठरावावर निवडणूक घेण्याचा आदेश दिल्यानंतर निबंधकानी बुधवारी सकाळी मतदान घेतलं.
बार्देश बाजारचे अध्यक्ष जयवंत नाईक यांच्या विरोधात ११ सदस्यांनी ९ जानेवारी रोजी सहकार निबंधकांकडे अविश्वास ठराव सादर केला होते. नियमानुसार सहकार निबंधकाने सात दिवसांच्या आत या ठरावावर मतदान घेणे बंधनकारक होते, परंतु त्यापूर्वी नाईक यांनी आपण स्वत:हून राजीनामा देणार असल्याची जाहीर केल्यानं मतदान घेण्यात आलं नाही. या काळात संचालक मंडळानं गुरुदास सावळ यांना अध्यक्षपदी नियुक्त केलं. हीच संधी साधून नाईक यांनी मंडळाला कायद्याच्या कचाट्यात पकडून राजकीय डाव साधण्याचा प्रयत्न केला. अजून राजीनामा दिला नसताना संचालक मंडळानं अध्यक्षपदी सावळ यांनी कशी निवड केली? असा प्रश्न करत त्यांनी सहकार निबंधकांकडे तक्रार केली. या तक्रारीला अनुसरून निबंधकांनी ११ संचालकांना नोटीस बजावली. त्याचवेळी ११ संचालकांनी अविश्वास ठरावावर मतदान घेण्याची विनंती सहकार निबंधकाना केली असता, त्यांनी बैठक घेण्यास नकार दिला. जोपर्यंत नाईक यांच्या तक्रारीचा निवाडा होत नाही, तोपर्यंत बैठक घेऊ शकत नाही, असा युक्तिवाद निबंधकांनी केला. याप्रकरणी एक संचालक धर्मा चोडणकर यांनी खंडपीठात धाव घेतली. याप्रकरणी न्यायालयानं दोन्ही बाजू ऐकून घेऊन सहकार निबंधकांना आधी अविश्वास ठरावावर मतदान घेण्याचा आदेश दिला. त्यानुसार बुधवारी संचालक मंडळाची बैठक बोलावण्यात आली होती. त्यात ११ मतांनी ठराव संमत करण्यात आला.

221
SHARES

Tags : , , ,

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close