OPPOSITION MOVES NO CONFIDENCE MOTION IN ASSEMBLY

Posted On August 3, 2016 By In Local, Politics, Top Stories


सरकरविरोधातील अविश्वास ठराव बारगळला
अविश्वासाच्या बाजूनं केवळ आठ सदस्य
शून्यकाळापूर्वी अविश्वासावर झाले मतदान
तीन अपक्षांबरोबर १२ जणांनी ठेवला होता अविश्वास ठराव

काँग्रेस, विरोधी अपक्ष आमदार आणि गोवा विकास पार्टी मिळून एकूण १२ आमदारांनी संयुक्त पद्धतीनं मंगळवारी राज्य सरकारच्या विरोधात अविश्वास ठराव दाखल केला होता. हा ठराव बुधवारी संख्याबळाअभावी बारगळला.
सरकारकडून विधानसभेत विरोधकांची मुस्कटदाबी सुरू आहे. सभापती अनंत शेट सत्ताधारी नेत्यांच्या इशाऱ्यावर काम करतात. त्यांची कृती पक्षपाती असून, ते विरोधकांना न्याय देण्यात पूर्णपणे अपयशी ठरले आहेत, असा ठपका ठेवत विरोधकांनी मंगळवारी सरकारविरोधात अविश्वास ठराव दाखल केला होता. अपक्ष आमदार विजय सरदेसाई यांनी पुढाकार घेऊन हा अविश्वास ठराव मांडला होता. त्यावर

काँग्रेसचे माविन गुदिन्हो वगळता इतर सर्व आमदार तसंच विजय सरदेसाई, रोहन खंवटे आणि नरेश सावळ या तीन अपक्षांबरोबरच सत्ताधारी पक्षातले मिकी पाशेको यांच्यासह एकूण बारा आमदारांनी या अविश्वास ठरावावर स्वाक्षरी केली होती.

विरोधी पक्षनेते प्रतापसिंह राणे, दिगंबर कामत, पांडुरंग मडकईकर, बाबू कवळेकर, विश्वजित राणे, जेनिफर मोन्सेरात, आलेक्स रेजिनाल्ड या काँग्रेसच्या सात आमदारांनी त्यावर स्वाक्षऱ्या केल्या होत्या. त्याचबरोबर रोहन खंवटे आणि नरेश सावळ या दोन अपक्ष आमदारांच्या त्यावर स्वाक्षऱ्या होत्या. काँग्रेसमधून निलंबित केलेले असंलग्न आमदार बाबूश मोन्सेरात यांनीही या नोटीसीवर स्वाक्षरी केली होती. दरम्यान, अनपेक्षितपणे सत्ताधारी गटात असलेले मिकी पाशेको यांनीही या ठरावावर स्वाक्षरी करुन विरोधकांशी हातमिळवणी केली आणि सत्ताधारी गटाला एक धक्का दिला; मात्र संख्याबळाच्या अभावामुळं हा ठराव तग धरू शकला नाही.

बुधवारी प्रश्नकाळ संपल्यानंतर शून्यकाळ चालू होण्यापूर्वी विरोधी पक्षनेते प्रतापसिंह राणे यांनी सभागृहात ठराव मांडला. यावेळी सभापती अनंत शेट यांनी आवाजी पद्धतीनं मतदान घेतलं. यावेळी विरोधकातील आठ सदस्यांनी जागेवर उभं राहून ठरावाच्या बाजूनं मतदान केलं. त्यामुळं ठराव बारगळला.

228
SHARES

Tags : ,

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close