PONDA SEWERAGE SYSTEM TO BE COMPLETED WITHIN 1 YEAR : PWD MINISTER

Posted On July 19, 2017 By In Local, People, Politics, Top Stories


फोंड्याचा सांडपाणी प्रकल्प वर्षभरात होणार पूर्ण
बांधकाममंत्री सुदिन ढवळीकर यांची सभागृहाला ग्वाही
सांडपाणी प्रकल्पावरून विरोधकांची सरकारवर सरबत्ती

फोंडाचा सांडपाणी प्रक्रिया प्रकल्प गेल्या वर्षी चालू केला होता. हा प्रकल्प एका वर्षांत पूर्ण करून लोकार्पण केलं जाईल, अशी ग्वाही बांधकाम मंत्री सुदिन ढवळीकर यांनी मंगळवारी सभागृहाला दिली. फोंड्याचे आमदार रवी नाईक यांनी प्रश्नोत्तराच्या तासाला उपस्थित केलेल्या असता मंत्री ढवळीकर यांनी सदर आश्वासन दिलं. या प्रश्नावरून आमदार आलेक्स रेजिनाल्ड आणि चर्चिल आलेमाव, लुईझिन फालेरो आणि प्रतापसिंह राणे यांनी मंत्री ढवळीकर यांना घेरण्याचा पुरेपूर प्रयत्न केला; मात्र ढवळीकर यांनी त्याला चोख प्रत्युत्तर दिलं. दरम्यान, मडगाव, नावेली आणि कुडतरी भागातील सांडपाणी प्रकल्प येत्या एक वर्षांत पूर्ण केले जातील, असंही आश्वासन मंत्री ढवळीकर यांनी दिलं.

236
SHARES

Tags : , , , ,

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close