रोहिदास शिरोडकर यांची ‘आप’ला सोडचिठ्ठी
समाजवादी पक्षाचे माजी प्रदेशाध्यक्ष रोहिदास शिरोडकर यांनी ‘आम आदमी पक्ष’ सोडला असून, हा पक्ष हुकूमशाही पद्धतीने काम करत असल्याचा आरोप त्यांनी केलाय. मंगळवारी फोंड्यात पत्रकार परिषद घेऊन त्यांनी ‘आम आदमी पक्षा’वर आरोप केले. शिरोडकर यांनी, २५ सप्टेंबर रोजी आप मध्ये प्रवेश केला होता. “या पक्षात बॉस असणार नाही, असे समजून मी प्रवेश केला होता. पण इथे आल्यावर समजले की इथेसुद्धा हुकूमशाही आहे. या पक्षाला गोव्याचे मुद्दे काय आहेत, ते सुद्धा माहीत नाहीत”, असे शिरोडकर पुढे म्हणाले.