SAO JOAO 2016

Posted On June 24, 2016 By In Entertainment, Local, Off-Beat, People, Top Stories


गोव्यात विशेषत: ख्रिस्ती बांधवांमध्ये लोकप्रिय असलेला सांजाव महोत्सव शुक्रवारी राज्यभरात साजरा करण्यात आला. हा महोत्सव बाप्टिस्ट सेंट जॉन यांना समर्पित करण्यात आलाय.

आगशी भागात सायमन कायदो आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी सांजव साजरा केला. त्यांनी रंगीबेरंगी पोषक करून डोक्यावर कोपेल नावाची फळाफुलांनी लडबडलेली परडी धारण केली होती.

सांताक्रूझ भागात मारियान अराऊजो आणि सहकाऱ्यांनी सांजाव साजरा केला. या ठिकाणी उत्साही तरुणांनी तुडूंब भरलेल्या विहिरीत मनसोक्त विहार केला.

कुडका भागात मारिया डिकुन्हा आणि सहकाऱ्यांनी सांजावची मिरवणूक काढली. या ठिकाणीही भर पावसात पाण्यानं भरलेल्या विहिरीत उत्साही तरुणांनी मजा केली.

183
SHARES

Tags : , , ,

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close