SENIOR MILITARY OFFICERS PAY RESPECTS TO DECEASED SOLDIERS

Posted On August 1, 2016 By In Local, National News, People, Top Stories


दहशतवाद्यांशी लढताना दोन जवान शहीद
शहीद जवानांचे पार्थिव पोहोचले गोव्यात
पणजी सैनिकी तळावर दिली मानवंदना
सुबेदार बसप्पा पाटील, सेपोय हसनसाब खुदावंद यांना सलाम

काश्मीरच्या कुपवाडा जिल्ह्यात दहशतवाद्यांशी लढताना सुबेदार बसप्पा पाटील आणि सेपोय हसनसाब खुदावंद या शूरांनी आपल्या प्राणांची आहुती दिली. या दोन्ही हुतात्म्यांचे पार्थिव सोमवारी सकाळी गोव्यात आणण्यात आलं. पणजी इथल्या सैनिकी तळावर त्यांना मानवंदना देऊन त्यांच्या मूळ गावी कर्नाटकात पाठवण्यात आलं.

श्रीनगर- भारत-पाकिस्तान सीमेनजीकच्या कुपवाडा जिल्ह्यात सुरक्षा दलाची दहशतवाद्यांशी जोरदार चकमक झाली. २९ जुलैच्या रात्री दहशतवादी घुसल्याची माहिती सुरक्षादलाला मिळाली होती. त्यानुसार २९ जुलैपासून मोहीम सुरू करण्यात आली होती. दहशतवाद्यांना शरण येण्याची सूचना सैनिकांनी केली; मात्र त्यांनी थेट गोळीबार चालू केला. याला सैन्यदलानं चोख प्रत्युत्तर दिलं आणि दोन्ही दहशतवाद्यांना कंठस्नानं घातलं. या चकमकीत दोन जवान शहीद झाले तर एक जवान जखमी झाला. दरम्यान, शहीद जवानांमध्ये बेळगाव येथील सुबेदार बसप्पा पाटील आणि धारवाड येथील सेपोय हसनसाब खुदावंद यांचा समावेश आहे. त्याचं पार्थिव सोमवारी विमानानं दाबोळी विमानतळावर आणण्यात आलं. त्यानंतर पणजी सैनिकी तळावर त्यांच्या पार्थिवाला मानवंदना देण्यात आली. त्यानंतर पार्थिव त्यांच्या मूळ गावी रवाना करण्यात आलं.

248
SHARES

Tags : , , ,

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close