SIXTH CASINO WILL POLLUTE MIRAMAR COAST; ENVIRONMENTALIST CRITICIZES GOVT

Posted On August 1, 2017 By In Local, People, Top Stories


सहावा कॅसिनो करणार मिरामार किनारा उद्ध्वस्त
पर्यावरण तज्ञांनी सरकारवर सडकून केली टीका

“मिया बीबी राजी तो क्या करेगा काजी’ या म्हणीप्रमाणे सरकारनं गोपाळ कांडा यांच्या कॅसिनोला मांडवी नदीत येण्यास पायघड्या घातल्या. आता हा कॅसिनो जगप्रसिद्ध किनारा उद्ध्वस्त होण्यास कारणीभूत ठरला आहे. या प्रकारावरून प्रदूषण नियंत्रण मंडळाचे सल्लागार ज्यो डिसोझा आणि पर्यावरणतज्ञ प्रा. राजेंद्र केरकर यांनी सरकारवर खरपूस टीका केलीये.

गोपाळ कांडा यांच्या कॅसिनो जहाजाला मांडवी नदीत परवानगी देऊ नये, अशी विनंती ज्यो डिसोझा यांनी पूर्वीच पत्राद्वारे केली होती; मात्र त्या विनंतीकडे सरकारनं सोयीस्कर दुर्लक्ष केलं. आता हे कॅसिनो जहाज पर्यावरणाला अत्यंत घातक बनल्याची प्रतिक्रिया डिसोझा यांनी व्यक्त केलीये.

दरम्यान, एका कॅसिनो जहाजासाठी मिरामार किनाऱ्याची प्रचंड हानी होणार असून त्याची कडू फळं या भागातील नागरिकांना भोगावी लागणाराहेत. पर्यावरणाचा कोणताही अभ्यास न करता चालू असलेलं ही खोदकाम त्वरित थांबावं, अशी मागणी पर्यावरणतज्ञ राजेंद्र केरकर यांनी केलीये.

243
SHARES

Tags : , , , , ,

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close