वाहतूक खाते होणार हायटेक
वाहन चालकांचा परवाना मिळणार घरपोच
वाहनाचे आरसी पुस्तिकाही मिळणार पोस्टाने
वाहतूक खात्याच्या संचालकांनी दिली माहिती
वाहतूक खातं अधिकाधिक जनताभिमुख करण्यासाठी सरकारनं प्रयत्न सुरू केलेत. यामध्ये वाहन चालकांचा परवाना आणि वाहनाचं आरसी पुस्तिका घरपोच देण्याची सुविधा येत्या चार दिवसांत सुरू करण्यात येणार असल्याची माहिती वाहतूक संचालकांनी पत्रकारांना दिली. यासाठी टपाल खात्याशी करार करण्यात येत असल्याचंही संचालकांनी यावेळी दिलं.