USGAON BAND SUCCESSFUL

Posted On October 18, 2016 By In Local, People, Top Storiesतिस्क उसगाव बंदला शंभर टक्के प्रतिसाद
‘दोड्डामणी कुटुंबीयांना त्वरित अटक करा’
तिस्क उसगावच्या ग्रामस्थांची मागणी

तिस्क-उसगाव येथील सिद्धांत मोहनदास गावस यांच्या दुकानात घुसून त्यांना मारहाण करणाऱ्या दोड्डामणी कुटुंबीयांना त्वरित अटक करावी, या मागणीसाठी मंगळवारी तिस्क उसगावमध्ये बंद पाळण्यात आला. या बंदला शंभर टक्के प्रतिसाद लाभला. स्थानिक व्यापाऱ्यांनी दुकाने बंद ठेवून आंदोलनाला पाठिंबा दिला.

तिस्क उसगाव इथं ट्रकवाल्यांमध्ये वाहतुकीवरून अधूनमधून वाद उफाळून येऊ लागलेत. याच वादाला गेल्या शनिवारी हिंसक वळण लागले. शनिवारी संध्याकाळी क्षुल्लक कारणावरून झालेल्या वादाचे पर्यावसन स्थानिक आणि परप्रांतीय भंगार अड्डेवाल्यांमध्ये हाणामारीत झाले. यातील भंगारअड्डे चालवणारे दोड्डामणी कुटुंबीयांने ट्रकमालकाचा भाऊ सिद्धांत गावस याच्या दुकानात जाऊन त्याला मारहाण केली आणि दूरदर्शन संचांचे नुकसान केले. त्यानंतर संतप्त स्थानिकांनी अर्जुन हाचियामणी, अशोक वडार, बलराज दोड्डामणी आणि बालाजी भेंडीगिरी यांच्या विरोधात तीव्र आंदोलन छेडलं. या सर्वांना गावातून हद्दपार करावं, अशी मागणी करत गावकऱ्यांनी मंगळवारी उसगाव बंदची हाक दिली. या बंदला शंभर टक्के प्रतिसाद मिळाला.

192
SHARES

Tags : ,

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close