VAN MAHOTSAV TO BE CELEBRATED ON 3RD JULY

Posted On June 25, 2016 By In Agriculture, Local, People, Top Stories


राज्यात ३ जुलै रोजी ‘वनमहोत्सव’
वनमहोत्सवानिमित्त पणजी दौड स्पर्धा
विजेत्यांना मिळणार भरघोस बक्षिसे
वनमंत्री राजेंद्र आर्लेकर यांची पत्रपरिषदेत माहिती
यंदापासून वनप्रेमींना मिळणार पुरस्कार

वनखात्यानं ३ जुलै रोजी ‘वन महोत्सवा’चं आयोजन केलं असून यानिमित्त धावण्याच्या स्पर्धेचं आयोजन केलं. वृक्षारोपणासारखे कार्यक्रम आयोजित करण्याऐवजी लोकांमध्ये जागृती करण्यासाठी या स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं. यातील विजेत्यांना भरघोस बक्षिसं दिली जातील, अशी माहिती वनमंत्री राजेंद्र आर्लेकर यांनी शनिवारी पत्रकार परिषदेत दिली.
वनमहोत्सवात होते वृक्षरोपण
वृक्षारोपनानंतर झाडांच्या देखभालीकडे होते दुर्लक्ष
यंदापासून रोपणानंतर वृक्ष संवर्धनावरही लक्ष्य देणार
वनमंत्री राजेंद्र आर्लेकर यांचे आश्वासन

वन खात्याकडून लक्षावधी रुपये खर्च करून दरवर्षी वनमहोत्सव साजरा केला जातो. या महोत्सवात वृक्षारोपण केलं जातं; मात्र नंतर त्या झाडांची देखभाल केली जात नाही. यापुढे असं होऊ नये, यासाठी वनखाते कार्यरत राहील, अशी ग्वाही वनमंत्री आर्लेकर यांनी दिली.

दरम्यान, यंदापासून वृक्षांवर जीवापाड प्रेम करणाऱ्या आणि त्यांचं संवर्धन करणाऱ्या वनप्रेमींना वनखात्यातर्फे पुरस्कार दिला जाईल, अशी माहिती आर्लेकर यांनी दिली.

219
SHARES

Tags : , ,

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close