रविवारी सुट्टीच्या दिवशी गुपचूप बैठक घेण्याचा प्रयत्न; सरपंचावर ग्रामस्थांचा प्रश्नांचा भडीमार सावर्डे मतदारसंघातील सावर्डे ग्रामपंचायतीत रविवारी सुट्टीच्या दिवशी गुप्तपणे बैठक घेण्यात आल्याने ग्रामस्थांत संतापाची लाट उसळली. बैठकीतून बाहेर पडत असताना ग्रामस्थांनी सरपंचांना रोखून ठेवलं आणि त्यांच्या कामकाजावर प्रश्नांचा भडीमार केला, तर पंचायत सचिवाने तत्काळ काढता पाय घेतल्याचे सांगितले जाते. या घटनेनंतर ग्रामस्थांनी सचिवाच्या तात्काळ निलंबनाची मागणी केली असून, बीडीओ आणि पंचायत संचालकांच्या कृतीकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
Categories
Civic Issues
सावर्डे पंचायतीत गुप्तपणे बैठक घेतल्याने ग्रामस्थांचा संताप — सचिवाच्या निलंबनाची मागणी
