Categories Civic Issues

अरुंद रस्त्यांवर पार्किंगचा वाढता त्रास

मोरजीत रस्त्यांवर वाहनांचे अतिक्रमण; वाहतूक विभागाकडे कारवाईची सरपंचांकडून मागणी मोरजी पंचायत क्षेत्रातील मुख्य रस्त्यावर अतिक्रमण करून मोठ्या प्रमाणात वाहने पार्क केल्यामुळे आधीच अरुंद असलेले रस्ते आणखी अरुंद झाले आहेत. वाहन चालक आणि वाहन मालकांनी मनमानी पार्किंग केल्याने वाहतुकीस अडथळा निर्माण होत असून, वाहतूक खात्याने अशा वाहनांवर तातडीने कारवाई करावी, अशी मागणी सरपंच विलास मोरजे यांनी केली आहे. दरम्यान, रस्ते रुंदीकरणाचे काम सुरू झाले असले तरी नागरिकांना भीती आहे की रुंद झाल्यानंतर पुन्हा या रस्त्यांवर वाहनांचे अतिक्रमण वाढून पूर्वीसारखीच परिस्थिती निर्माण होईल.

About The Author

More From Author

1 comment

Your email address will not be published. Required fields are marked *