शाश्वत शेती आणि नारळ संवर्धनासाठी राज्य सरकारची बांधिलकी : मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत “आपण ‘माड’ जपला तर गोवा जपला जाईल ,” असा संदेश देत मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी दोना पावला येथील आंतरराष्ट्रीय केंद्रात आयोजित पहिल्या राष्ट्रीय नारळ परिषदेचे उद्घाटन केले. या परिषदेत राज्यभरातील शेतकरी, संशोधक आणि धोरणकर्ते सहभागी झाले. परिषदेत हवामान बदल, मृदासंवर्धन, पुनर्लागवड आणि पिक संरक्षण या महत्त्वाच्या विषयांवर चर्चा झाली. नारळ शेती आणि शाश्वत कृषी क्षेत्रात योगदान दिलेल्या गोमंतकीय शेतकऱ्यांचा सन्मानही करण्यात आला. मुख्यमंत्री सावंत यांनी सांगितले की, नारळ लागवड वाढवून शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढवणे, तसेच गोव्याचे नैसर्गिक सौंदर्य आणि पर्यटन क्षमता वृद्धिंगत करणे हे सरकारचे ध्येय आहे. राज्य सरकार प्रत्येक शेतकऱ्याच्या पाठीशी ठामपणे उभे असून, शाश्वत आणि सर्वसमावेशक विकासासाठी प्रयत्नशील आहे.
Categories
Political
गोव्यात प्रथमच राष्ट्रीय नारळ परिषद

