परवानगीशिवाय कार्यक्रम आयोजित करण्याचा प्रयत्न; रस्त्यांची रुंदी अपुरी, सुरक्षेचा धोका गंभीर मुरगाव नगरसेवकांनी प्रस्तावित फॉर्म्युला ४ शर्यतीला तीव्र विरोध दर्शविला आहे. या कार्यक्रमाबाबत स्थानिक नागरिकांनाही माहिती देण्यात आलेली नाही, तसेच त्यांच्या मतांची दखल घेतलेली नाही, असे नगरसेवकांचे म्हणणे आहे. १२ ते १४ मीटर रस्त्यांची आवश्यकता असताना मुरगावातील रस्ते केवळ ६ मीटर रुंद आहेत, यामुळे गंभीर सुरक्षेचा प्रश्न निर्माण झाला आहे. नगरपालिका, उपजिल्हाधिकारी किंवा मामलेतदार कार्यालयातून कोणतीही परवानगी न घेता तयारी सुरू असल्याचे उघड झाले असून, याविरोधात नागरिकांच्या आक्षेपांसह निवेदन संबंधित विभागांना तसेच मुख्यमंत्री यांनाही देण्यात आले आहे.
Categories
Civic Issues

… [Trackback]
[…] Find More on that Topic: ingoanews.com/फॉर्म्युला-४-शर्यतीला-मु/ […]