जखमी विद्यार्थ्यांना सांगे आरोग्य केंद्रात दाखल; कंत्राटदाराच्या कामाच्या दर्ज्यावर प्रश्न सांगे येथील हायअर सेकंडरी शाळेच्या हॉलमधील फॉल्स सिलिंग कोसळल्याने चार विद्यार्थी जखमी झाले आहेत. त्यांना तातडीने सांगे आरोग्य केंद्रात उपचारासाठी दाखल करण्यात आले. यामुळे कंत्राटदाराच्या कामाच्या गुणवत्तेवर प्रश्न उपस्थित झाले असून याबाबत सखोल चौकशी करण्याची मागणी करण्यात येत आहे. यापूर्वी सत्तरीत छताचा पंखा पडून विद्यार्थिनी जखमी झाल्याची घटना घडली होती, अशा पार्श्वभूमीवर ही घटना अधिक गंभीर ठरली आहे.
Categories
Civic Issues
सांगे हायअर सेकंडरी शाळेत फॉल्स सिलिंग कोसळून चार विद्यार्थी जखमी

