आमदार निधीतून काम; आणखी पाच रस्त्यांची कामे लवकरच हाती हळदोणेचे आमदार कार्लोस आल्वारेस फेरेरा यांनी बुधवारी कालवी येथे पावसाळ्यात वाहून गेलेल्या पादचारी मार्गाच्या दुरुस्तीच्या कामाचे उद्घाटन केले. एबी मेंडीस हाऊस ते आना मारिया हाऊस आणि वार्ड क्रमांक . ९ मधील आजूबाजूच्या परिसराचा समावेश असलेले हे काम हळदोणा ग्रामपंचायत हद्दीत आमदार निधी योजनेअंतर्गत हाती घेण्यात आले आहे. या प्रकल्पासाठी रुपये १९ लाखांचा खर्च मंजूर करण्यात आला असून, काम पूर्ण करण्यासाठी ९० दिवसांची मुदत निश्चित केली आहे.
Categories
Civic Issues

