Categories Civic Issues

एलपीजी एजन्सीकडून ग्राहकांची गैरसोय; उन्हात तासभर रांगेत उभे

“एकच संगणक” असल्याचे कारण; ग्राहकांना टोपी घालून थांबण्याचा सल्ला एलपीजी गॅस सिलेंडर बुकिंगसाठी आलेल्या ग्राहकांना तीव्र उन्हात तब्बल तासभर उभे राहण्यास भाग पाडल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. कोणतीही योग्य प्रतीक्षेची सोय नसताना नागरिकांना बाहेरच रांगेत थांबावे लागले. याबाबत विचारणा केल्यावर एजन्सीकडून “एकच संगणक” असल्याचे कारण देण्यात आले, तसेच ग्राहकांना टोपी घालून थांबण्याचा सल्लाही देण्यात आला. या प्रकारामुळे स्थानिकांमध्ये संताप व्यक्त होत असून ग्राहक सेवेसंदर्भात गंभीर प्रश्न उपस्थित होत आहेत.

About The Author

More From Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *