Categories Political

फोंडा पोटनिवडणूक रद्द प्रकरण सर्वोच्च न्यायालयात

मतदानाच्या १६ तास आधी निर्णय; काँग्रेसचा सरकारवर गंभीर आरोप, निवडणूक आयोगावरही टीका पोंडा पोटनिवडणुकीला मतदानाच्या अवघ्या १६ तास आधी स्थगिती देण्यात आल्याने राज्यात राजकीय वादळ निर्माण झाले आहे. काँग्रेस नेते गिरीश चोडणकर यांनी मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांच्यावर पराभवाच्या भीतीपोटी घटनात्मक यंत्रणांचा गैरवापर केल्याचा आरोप केला आहे. प्रचार संपल्यानंतर आणि मतदार सज्ज असताना घेतलेल्या या अचानक निर्णयामुळे लोकशाही प्रक्रियेवर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे. या पार्श्वभूमीवर काँग्रेस उमेदवार केतन भाटीकर यांनी निवडणूक पुन्हा घेण्याची मागणी करत सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली असून, यावर या आठवड्यात सुनावणी होण्याची शक्यता आहे.

About The Author

More From Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *