Categories Civic Issues

मुरगाव पालिकेत नगराध्यक्ष गिरीश बोरकर यांचा वाढदिवस साजरा

कामगारांना विमा कवच आणि कामाची शाश्वती मुरगाव नगरपालिकेचे नगराध्यक्ष गिरीश बोरकर यांचा वाढदिवस पालिका कर्मचाऱ्यांनी मोठ्या उत्साहात साजरा केला. यावेळी बोलताना बोरकर यांनी कामगारांच्या कल्याणासाठी घेतलेल्या ऐतिहासिक निर्णयांचा पुनरुच्चार केला. रोजंदारीवरील कामगारांना तात्पुरता दर्जा देऊन त्यांना नोकरीची शाश्वती दिली असून, अशा कामगारांना विमा कवच देणारी मुरगाव ही राज्यातील पहिली नगरपालिका ठरली आहे. पालिकेच्या या कामगारभिमुख धोरणामुळे कर्मचाऱ्यांमध्ये समाधानाचे वातावरण असून त्यांनी नगराध्यक्षांचे आभार मानले.

About The Author

More From Author

5 comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *