महापौर रोहित मोन्सेरात यांची माहिती; सांडपाण्याच्या प्रवेशामुळे मासे मृत्यूमुखी, दीर्घकालीन उपाययोजनेवर भर मळा तलावात मोठ्या प्रमाणावर मासे मृत्यूमुखी पडल्याच्या पार्श्वभूमीवर प्रदूषणाचा प्रश्न गंभीर बनला असून, सांडपाण्याचा प्रवेश हा मुख्य कारण असल्याचे स्पष्ट झाले आहे. यासंदर्भात प्रदूषण नियंत्रण मंडळाने पाण्याचे नमुने तपासणीसाठी घेतले असून, ही परिस्थिती संभाव्य आरोग्य संकट ठरू शकते, असा इशारा देत महापौर रोहित मोन्सेरात यांनी १५ एप्रिल रोजी सर्व संबंधित विभागांची संयुक्त बैठक बोलावली आहे. या बैठकीत सर्वसमावेशक आणि दीर्घकालीन उपाययोजना ठरवण्यावर भर दिला जाणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
Categories
Civic Issues
मळा तलावातील प्रदूषणाचा प्रश्न गंभीर; १५ एप्रिलला सर्व विभागांची संयुक्त बैठक
